| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हा दौरा आत्तापर्यंत त्यांच्यासाठी संमिश्र ठरला आहे. या दौऱ्यात टी-20 मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिकेत मात्र भारतीय संघाला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. आता या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिय या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना शुक्रवारी (दि.6) सुरू होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल. या सामन्याने भारतीय संघ या दौऱ्याचा शेवट करेल. दरम्यान, सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. भारताची वेगवान गोलंदाज रणूका सिंग ठाकूर या सामन्यातून बाहेर झाली आहे. तिचे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ती सामन्यासाठी उपलब्ध नसेल. ती संघातून बाहेर झाल्याने काशवी गौतम हिला बदली खेळाडू म्हणून भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. काशवी या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतही भारतीय संघाचा भाग होती.
भारतीय महिलांची कसोटी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606