कोरोनामुळे भारताचा आफ्रिका दौरा संकटात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
जगाला लॉकडाउनचा फटका दिलेल्या कोरोनामुळे पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक लागण्याची भिती निर्माण झालीये. कोरोनाच्या संकटातून जग हळूहळू सावरत असताना दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट आढला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये भारतीय संघाचा नियोजित दक्षिण आफ्रिका कार्यक्रम संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे.
देशात नवा वेरिएंट आढळल्यानंतर दक्षिण अफ्रिकी सरकारने महाय-अलर्टफ जारी केलाय. परदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ब्रिटन सरकारने दक्षिण अफ्रिकेसह पाच अन्य देशातील हवाई प्रवासावर निर्बंध घातले आहेत.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यात तीन कसोटी, तीन वनडे आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. वरिष्ठ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी इंडिया ए टीम दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी त्याठिकाणी पोहचली आहे. चार दिवसीय तीन सराव सामन्याला त्यांनी सुरुवातही केली. या संघात अनेक वरिष्ठ संघातील खेळाडूंचाही समावेश आहे.

Exit mobile version