दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली
| गुवाहाटी | वृत्तसंस्था |
न्यूझीलंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही मायदेशात कसोटी मालिकेत भारतीय संघाचा सुपडा साफ केला आहे. कोलकाता कसोटीत झालेल्या पराभवानंतर गुवाहाटीत झालेल्या गुवाहाटी कसोटीतही भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी 549 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला भारतीय संघाचा डाव अवघ्या 140 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला हा सामना 408 धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान, या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 2-0 मालिका जिंकून 25 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत पहिल्याच डावात 489 धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना एडेन मारक्रमने 38, रायन रिकल्टनने 35, ट्रिस्टन स्टब्सने 49, तेंबा बावूमाने 41 धावांची खेळी केली होती. या डावात सेनुरन मुथूसॅमीने 109 आणि मार्को यान्सने 93 धावांची तुफानी खेळी केली. यासह पहिल्या डावात 489 धावांचा डोंगर उभारला.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्या डावात अवघ्या 201 धावा करता आल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैस्वालने 58 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 22 धावांची खेळी केली. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 48 धावा केल्या. या दोघांना वगळलं, तर इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव स्वस्तात आटोपला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली. याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टनने 35 धावांची खेळी केली. तर एडन मारक्रमने 29 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने 94 धावा केल्या. त्यानंतर टोनी डे जोर्जीने 49 आणि वियान मुल्डरने 35 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने दुसका डाव 5 गडी बाद 260 धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी 549 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वालने 13, केएल राहुलने 6 आणि साई सुदर्शनने 14 धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 2, ऋषभ पंतने 13, वॉशिंग्टन सुंदरने 16 धावांची खेळी केली.






