आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा बोलबाला

स्मृती मंधानाचा टॉप 5 मध्ये प्रवेश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) महिलांची वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या यादीत टॉप 5 मध्ये दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. 2021 चा सर्वश्रेष्ठ महिला वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणार्‍या स्मृती मंधानाचा टॉप 5 मध्ये समावेश झाला आहे. तर भारतीय संघाची कर्णधार मिताली राज दुसर्‍या स्थानी कायम आहे.


ही रँकिंग जाहीर करण्यापूर्वी स्मती मंधाना सातव्या स्थानी होती. आता ती दोन पाऊल पुढे सरकत 710 रेटिंग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी पोहोचली आहे. तर मिताली राज 738 रेटिंग पॉईंट्ससह दुसर्‍या स्थानी कायम आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा हेली 742 रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनी 719 रेटिंग पॉइंट्ससह तिसर्‍या आणि एमी सेटरवेट 717 रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे.

झुलन गोस्वामी दुसर्‍या स्थानी
गोलंदाजांच्या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी 727 रेटिंग पॉइंट्ससह दुसर्‍या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासेन 773 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे.

Exit mobile version