नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
2000 मध्ये लारा दत्ताने विजेतेपद पटकावल्यानंतर 21 वर्षांनी भारताची हरनाज संधू ही नवीन मिस युनिव्हर्स ठरली आहे. संधूने इस्रायलमधील इलात येथे आयोजित ७०व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पंजाबच्या 21 वर्षीय तरुणीने पॅराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मस्वाने यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. हरनाज संधूच्या आधी फक्त दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे – 1994 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता.