| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडलेल्या विश्वचषकाच्या लीग सामन्यात भारताच्या संघाने आणखी एकदा पाकिस्तानी खेळाडूंना नेस्तानाभूत केले आहे. भारताच्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर ईशान किशनने खेळी सांभाळली पण जेव्हा पाकिस्तानच्या संघाने पहिले तीन ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर त्यांचा खेळ मात्र कोणाला सांभाळता आला नाही. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
पाकिस्तानचे पहिले तीन फलंदाज दोन अंकी आकडा देखील पार करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानच्या क्रिकेट गोलंदाजांची सामन्याच्या आधी बरीच चर्चा झाली पण भारतीय फलंदाजांसमोर फार काही त्यांची चालली नाही. चर्चेत असलेला साहित्याचा फरहान हा शून्यावर बाद झाला तर सॅम अयुब हा सहा धावा केल्या आणि त्याला जसप्रीत बुमराह याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान मध्ये चार धावा केल्या आणि जसप्रीत बुमराह त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये दोन विकेट्स घेऊन भारताला विजयाच्या दिशेने अग्रेसर केले.
पाकिस्तानच्या संघासाठी संघाचा फलंदाज उस्मान याने 44 धावांची खेळी खेळली पण तो पाकिस्तान विजयपर्यंत नेण्यात अपयशी ठरला. उस्मान खान आणि शादब खान यांची चांगली भागीदारी झाली होती पण अक्षर पटेल याने भारताला पाचवा विकेट मिळवून दिला. शादाब खान याने 14 धावा केल्या आणि तिलक वर्मा याने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाकिस्तानच्या संघाची या सामन्यामध्ये खराब फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर हार्दिक पांड्याने भारताच्या संघाला एक विकेट मिळवून दिला त्यांनी त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट घेतला तर जसप्रीत बुमराह याने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये दोन विकेट्स मिळवून दिले अक्षर पटेलने देखील त्याच्या स्पेलमध्ये दोन विकेट्स मिळवून दिले.







