भारताच्या ज्योतीने रचला इतिहास; अडथळे पार करीत पटकाविले कांस्यपदक

केवळ 0.01 सेकंदाने हुकले ऑलिम्पिकचे तिकीट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने राष्ट्रीय विक्रमासह कांस्यपदक नावावर केले. महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने 12.78 सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पण, 0.01 सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे ( 12.77 सेकंद) तिकीट हुकले आहे. 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू आहे.

स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया फोर्स्टरने 12.72 सेकंदात सुवर्ण, तर चीनच्या यानी वूने 12.76 सेकंदात रौप्यपदक जिंकले. आणखी एक राष्ट्रीय विक्रमी धावपटू अमलान बोरगोहेन यानेही पुरुषांच्या 200 मीटरमध्ये हंगामातील सर्वोत्तम वेळ 20.55 सेकंदासह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने 12.78 सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पण, 0.01 सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे (12.77 सेकंद) तिकीट हुकले. 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे.

लहानपणापासूनच अडथळ्यांची शर्तत
28 ऑगस्ट 1999 मध्ये विशाखापट्टणम येते जन्मलेल्या ज्योतीची लहानपणापासूनच अडथळ्यांची शर्यत सुरू होती. तिचे वडील सूर्यनाराणन हे एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत, तर तिची आई कुमारी या सिटी हॉस्पिटलमध्ये पार्ट टाईम सफाईचं काम करतात. या दोघांचं मिळून महिन्याचं उत्पन्न हे 18 हजाराच्या आसपास आहे. तरीही ज्योतीने हार मानली नाही. ज्योतीचे समर्पण आणि परिश्रम पाहून शारीरिक शिक्षण शिक्षिकेने तिला शालेय जीवनातच ओळखले होते. ज्योतीची उंची पाहून त्यांना वाटले की ती अडथळा शर्यतीत धावपटू बनू शकते. इथून ज्योतीचा ॲथलीट होण्याचा प्रवास सुरू झाला.

जिद्दीने मिळविले यश
थायलंडमध्ये झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योतीने सुवर्णपदक जिंकून संपूर्ण भारताचा अभिमान वाढवला आहे. वयाच्या 15व्या वर्षी आंध्र प्रदेशच्या जिल्हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ज्योतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2016 मध्ये तिने हैदराबादमध्ये एन रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. कौटुंबिक परिस्थितीची पर्वा न करता ज्योतीने तिची मेहनत सुरूच ठेवली, त्याचे फळही तिला मिळाले.

Exit mobile version