| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
विश्वचषकातील महत्त्वाचा समजला जाणारा भारत-पाक सामना भारताने सात गडी राखून जिंकला. पाकिस्तानने सर्व गडी बाद 191 धावा केल्या होत्या. भारताने 192 धावांचे हे लक्ष्य 30.3 षटकांमध्ये पूर्ण केले. सलामीला आलेल्या रोहित शर्माने 6 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 53 धावा करुन भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. शुभमन गिल आणि विराट कोहली हे दोघे लवकर बाद झाले. भारताच्या विजयात गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली.







