केला 143 धावांनी पराभव; स्मृती मानधनाची शतकी खेळी
| बंगळुरू | वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला आणि द. आफ्रिका महिला संघात रविवारपासून (दि.16) 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने 143 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि आशा शोभनाने मोलाचा वाटा उचलला आहे. यात स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला असून एकदिवसीय 6व्या शतकाची देखील नोंद केली आहे. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने 127 बॉलमध्ये 117 धावा केल्या. तिने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिचा घोषचा बळी गेल्यावर भारतीय संघाची धाव संख्या 5 बाद 99 अशी होती. यावेळी दीर्प्ती आणि स्मृती सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा 48 बॉलमध्ये 37 धावावंर बाद झाली. त्यामुळे भारतीस संघाची स्थिती 6 बाद 180 अशी झाली होती. त्यानंतर स्मृती मंधानाने भारतीय संघाचा डाव सावरला. त्यामुळे भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 8 बाद 265 धावा केल्या. तसेच, आशा शोभनाने नऊ षटकांत 21 धावा देत 4 बळी घेतले. आणि अफ्रिकेच्या संघाला सर्वबाद 122 धावांवर रोखले.
7 हजार धावांचा टप्पा
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. याआधी भारताची माजी दिग्गज खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावा करण्याचा विक्रम नोंदवत पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली होती. त्यानंतर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे.