इंडियाचे उद्या शक्तिप्रदर्शन; मुंबईत दोन दिवस बैठक

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक गुरुवारी (दि.31)आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने भाजपच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडीच्या बैठकीत 26 ते 28 पक्ष सहभागी झालेत. सर्व पक्षातील सहकारी या बैठकीसाठी मेहनत घेत आहेत. याआधी 2 बैठका झाल्या आता तिसरी बैठक मुंबईत होत आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.आज झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यानी भाजपवर हल्लाबोल करताना केंद्रात इंडिया आघाडीचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येईल,असा दावा केला.

पवारांचे आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेकवर टीका केली. राष्टवादी काँग्रेकवर टीका करत असताना राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळ्याबद्दल सांगितलं. पण सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती पंतप्रधानांकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर ठेवावी. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, तुमच्या हाताता अता सत्ता आहे, चौकशी करा असं आव्हान शरद पवार यांनी केलं आहे.

सर्व राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणे हेच आमचे काम नाही. विकास करणे हादेखील आमचा अजेंडा आहे. आम्ही एकत्र ताकदीने पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. देशात द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना रोखण्याचं आव्हान आम्ही स्वीकारले आहे. सकारात्मक ध्येय ठेऊन आम्ही पुढील वाटचाल करत आहोत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आघाडीत सर्व एकत्र येत आहेत.

अशोक चव्हाण, काँग्रेस नेते

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं किंवा केंद्रशासित करणं हा भाजपाचा डाव आता उघड झाला आहे. आम्ही सत्तेत असताना असा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती. आत्ताही आम्ही हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही.

उद्धव ठाकरे, शिवसेना नेते

‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या दोन बैठका अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. आता पुढील बैठकींमध्ये इंडिया आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमाबाबत चर्चा होईल. त्यानंतर काही जणांची समिती स्थापन करून राज्यनिहाय स्थानिक पातळीवर आघाडीतील जागांबाबत, इतरांच्या समावेशाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी
मी उद्याच शपथ घ्यायला जातो
विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये देशभरातील 28 पक्षांचा समावेश आहे. यातील काही पक्षांकडून आपल्या नेत्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सूचवले जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुमचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं जात असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना उद्धव यांनी मी उद्याच शपथ घेण्यासाठी जात असल्याची मिश्किल टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांच्या हजरजबाबीपणाने पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ उडाला.
Exit mobile version