। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतात टेनिस या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर सानियाने निवृत्तीच्या योजनेची घोषणा केली. 2022 हा माझा शेवटचा हंगाम असेल. तो मला पूर्ण करायचा आहे असे सानियाने सांगितले. ङ्गमी ठरवलय हा माझा शेवटचा सीजन असेलफ, असे सानियाने सांगितले आहे.