इंग्लंड सर्वबाद 218; भारताची दमदार सुरूवात
| धर्मशाला | वृत्तसंस्था |
धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने एक गडी गमवून 135 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत 83 धावांनी पिछाडीवर होता. रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 26 धावा करून नाबाद माघारी परतले. यशस्वी जैस्वाल 58 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. एचपीसीए स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली 79 धावा करून बाद झाला. उर्वरित फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत, त्यामुळे 218 धावा करून संघ सर्वबाद झाला. भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने 5 आणि रविचंद्रन अश्विनने 4 बळी घेतले. रवींद्र जडेजालाही यश मिळाले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 26 धावा करून नाबाद माघारी परतले. यशस्वी जैस्वालने 57 धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही एक हजार धावा पूर्ण केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने एकमेव बळी घेतला. त्याने यशस्वीला यष्टीमागे यष्टिचित केले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, मार्क वुड आणि टॉम हार्टले यांनीही गोलंदाजी केली. मात्र, कोणालाच यश मिळाले नाही.
भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून पाचव्या कसोटीला धर्मशाला स्टेडिअमध्ये सुरु झाला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिली फलंदाजी केली. पण त्यांच्या हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कुलदीप यादवने आपल्या कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा पाच बळी घेण्याची कामगिरी केली. कुलदीपने इंग्लंडची पहिली फळी उद्ध्वस्त केली.
धर्मशाला कसोटीत इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. एकवेळ अशी होती, इंग्लंडने 25 षटकात 100 धावा करत फक्त एक फलंदाज गमावला होता. इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पुढच्या 75 धावात इंग्लंडने पाच फलंदाज गमावले. इंग्लंडची अवस्था 175 वर 6 बळी अशी झाली. कुलदीप यादवने पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. याबरोबरच कुलदीपच्या नावावर एक अनोखं अर्धशतकही जमा झाले आहे. कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत 50 बळींचा टप्पा पूर्ण केला. कुलदीप यादव, अक्षर पटेल, इरापल्लीप्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर यांनी 12 कसोटी सामन्यात 50 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाज आहे. अश्विनने अवघ्या 9 कसोटी सामन्यात 50 बळी घेतले आहेत.
कुलदीप यादवने इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेट, ओली पोप, जॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या प्रमुख फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादवबरोबर आर अश्विननेही चार बळी घेण्याची कमाल केली. अश्विनने अवघ्या 51 धावात चार बळी घेतले. कुलदीप यादवने पहिली फळी बाद केली. तर अश्विनने इंग्लंडचं शेपूट जास्त वळवळू दिले नाही. शेवटचे पाच फलंदाज अवघ्या 43 धावात तंबूमध्ये परतले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने 18 वे अर्धशतक पूर्ण केले. शोएब बशीरविरुद्ध सिंगल घेत त्याने 77 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीत 11 शतके झळकावली आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात पहिल्या गड्यासाठी पन्नासची भागीदारी झाली. ही भागीदारी यशस्वीच्या बळीसह तुटली. तो 57 धावा करून बाद झाला. पहिल्या डावात भारताचा पहिला गडी 21व्या षटकात बाद झाला. यशस्वी जैस्वाल 57 धावा करून बाद झाला. शोएब बशीरने त्याला बेन फॉक्सकरवी झेलबाद केले.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावात हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. विनोद कांबळी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 14 डावात तर यशस्वीने 16व्या डावात हा टप्पा गाठला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी 12व्या षटकात पन्नासची भागीदारी केली. रोहित शर्माने टॉम हार्टलीविरुद्ध चौकार मारून संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लिश फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या एका षटकात 3 षटकार ठोकले. त्याने 9व्या षटकातील तिसर्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार लगावला. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने (79) अर्धशतक झळकावले. भारताकडून कुलदीप यादवने 5 बळी घेतले. त्याचवेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी खेळत 4 बळी घेतले. रवींद्र जडेजाने एक फलंदाज बाद केला. इंग्लंड 218 धावांवर सर्वबाद झाला आहे.
धर्मशाला कसोटीत भारताच्या अकारा खेळाडूंमध्ये दोन बदल करण्यात आले. युवा फलंदाज रजत पाटीदारच्या जागी डाव्या हाताचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली. देवदत्त पडिक्कलने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या कसोटी मालिकेत भारताकडून तब्बल पाच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. याआधी रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान आणि आकाश दीपने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्यांदा अशी घटना घडली आहे.