बॉक्सिंगमध्ये भारताची तीन पदके निश्‍चित

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली. तिने 75 किलो वजन गटाच्या उपांत्यपूूर्व फेरीत रोमहर्षक विजय संपादन केला. तिने लढतीत कझाकिस्तानच्या वालेनटिना खालजोवावर 3-2 ने मात केली. यासह तिने अंतिम चारमधील प्रवेश निश्‍चित केला. यासह तिचे स्पर्धेतील पदकही निश्‍चित झाले आहे. अंकुशिता (66 कि.), मीनाक्षी (52 कि.), प्रीती (57 कि.) यांनी आपापल्या गटाची उपांत्य फेरी गाठत पदक निश्‍चित केले आहे. दरम्यान, पूजाला 70 किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अंकुशिताने सुबाताचा पराभव केला.

Exit mobile version