। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वेस्ट इंडीज व अमेरिका येथे येत्या (दि.2) जूनपासून टी-20 विश्वकरंडकाची धूम रंगणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावणारी घटना घडली आहे. आयसीसीकडून बुधवारी टी-20 प्रकारातील सध्याची क्रमवारी जाहीर करण्यात आली. भारतीय संघाने यामध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून बलाढ्य ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानावर विराजमान आहे. गतविजेता इंग्लंडचा संघ तिसर्या स्थानावर असून न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज अदिल रशीद याने पहिले स्थान पटकावले आहे. भारताचा अक्षर पटेल तिसर्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा याने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
सूर्यकुमार अग्रस्थानी भारताचा टी-20 स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. फिल सॉल्ट याने दुसरे, तर मोहम्मद रिझवान याने तिसरे स्थान मिळवले आहे. बाबर आझम चौथ्या स्थानी असून एडन मार्करम पाचव्या स्थानी आहे.