। मुंबई । वृत्तसंस्था ।
डिजिटल युगात कागदी नोटांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. क्रेडीट, डेबीट क्रार्डनंतर डिजिटल पेमेंटमुळे नगद व्यवहार अवघ्या काही सेकंदावर आणि एक-दोन क्लिकवर आला आहे. चलनाचा इतिहास खूप जुना असला तरी त्यातील होत गेलेले बदल काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाची स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याचा मानस व्यक्त केला आहे.
क्रिप्टो करन्सीवरुन देशात अविश्वासाचे वातावरण आहे. सरकारने या चलनाच्या देवाण-घेवाणीला अद्यापही अधिकृत घोषीत केलेले नाही. त्यासाठी संसदेत बिल आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. या पाश्वर्र्भूमीवर आरबीआयने काळाची पाऊले ओळखत डिजिटल करन्सी मार्केटमध्ये उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. या करन्सीचे नाव सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी असे आहे. दोन टप्प्यात ही करन्सी आणण्याचा प्रयत्न बँक करणार आहे. ईटी नाऊ स्वदेशच्या अहवालानुसार, बेस्ड होलसेल अकाऊंट साठी पायलट टेस्टिंग लवकरच सुरु होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक डिजिटल करेन्सीच्या लोकार्पणासाठी स्वतःला पुर्णपणे तयार ठेवले आहे.