। चिपळूण । प्रतिनिधी ।
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी निर्मित सचित्र भीत्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता कदम तर प्रियांका जाधव यांच्या आभारप्रदर्शन केले.