इनडोअर क्रिकेट स्पर्धा

न्यूझीलंड-एशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनने बेंगलोर मध्ये न्यूझीलंड एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 2 ते 6 मे या कालावधीत बेंगळुरू येथे केले आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई व सिंगापूर हे देश सहभागी होत आहेत. या स्पर्धेत खुला गट व मास्टर्स (40+) गटाचे संघ सहभागी होत आहेत.

सदर स्पर्धेसाठी बेंगलोर येथे 25 मार्च रोजी मैदानी चाचणी घेऊन भारतीय संघाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने भारताने दोन्ही गटात दोन-दोन संघ उतरवण्याचे ठरविले आहे. भारतीय संघ या स्पर्धेत इंडिया व डेवलपमेंट इंडिया या नावाने दोन्ही गटात ऊतरणार आहेत. खुल्या गटाच्या इंडिया व डेवलपमेंट इंडिया संघातील खेळाडूंची नावे इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी जाहीर केली.

महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे (महाराष्ट्र) संस्थापक कार्याध्यक्ष क्षितिज वेदक व संस्थापक सेक्रेटरी बाळ तोरसकर यांच्या पुढाकाराने भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडुंचे प्रशिक्षण शिबीर पार्क क्लब, दादर, मुंबई, महाराष्ट्र येथे पार पडले. या शिबिराला भारतीय मास्टर्स गटाचे प्रशिक्षक प्रसन्ना कुमार यांनी मार्गदर्शन केले. तर ऊर्वरीत प्रशिक्षण शिबीर बंगळुरु , कर्नाटक येथे भारतीय संघाचे खुल्या गटाचे प्रशिक्षक संतोष आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

भारत : गिरीश के. जी. (कर्णधार ), धनुष भास्कर (उप कर्णधार), विजय गौडा, दैविक राय, सूरज रेड्डी, अफरोज पाशा, मोहम्मद रुमन, नमशीद, एरीस, मोहम्मद तल्हा, आशिक क्रिस्टी, मल्लिकार्जुन एम. व प्रशिक्षक – संतोष आनंद

डेवलपमेंट इंडिया : के. आर. चेतन राज (कर्णधार), आबिद खान (उप कर्णधार), नितीन पाल, अभिषेक राज्यगुरु, योगेश जी., वैभव, नवनीत सिंह, शिव दर्शन, मोहम्मद इशान, यशवर्धन दानी, नचिकेत कांबळी, शुभम खोत व प्रशिक्षक – संतोष आनंद.

Exit mobile version