| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सोमवार, दि.31 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
सकाळी 8.10 वाजता मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया (गेट नं. 4) येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता बोटीने मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने आक्षी, ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता मराठी भाषा आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: ग्रामपंचायत आक्षी, ता.अलिबाग). सकाळी 9:50 वाजता आक्षी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग कडे प्रयाण.
सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 10:30 वाजता आंबेत पूलसंदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता दिवस मानवंदना संचलन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11:30 वाजता जनता दरबार (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग).
दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). दुपारी 2:30 वाजता कार्यकर्त्यांच्या भेटी (स्थळ: तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग). दुपारी 3:30 वाजता तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथून मोटारीने सोगावकडे प्रयाण. दुपारी 3:45 वाजता चंद्रकला कुमार कदम यांच्या स्टूडिओ व निवासस्थानी सदिच्छा भेट (स्थळ: पितृसावली, सोगाव, ता.अलिबाग, जि.रायगड) दुपारी 4:15 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. दुपारी 4:45 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व मोटारीने मंत्रालयाकडे प्रयाण.