उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीचे इंजिन भर समुद्रात पडले बंद

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

राज्यात नेत्यांच्या अपघातांच्या घटना सुरू असतानाच उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत सुद्धा मोठ्या अपघातातून बचावले आहेत. अलिबाग-मांडवाहून मुंबईत येताना ते प्रवास करत असलेली स्पीड बोट अचानक बंद पडली. बोटीमधील सर्व यंत्रणा अचानक बंद पडल्याने कॅप्टनला रेस्क्यूसाठी आपत्कालीन संदेशुद्धा पाठवता येत नव्हता. मात्र, लागलीच दुसरी स्पीड बोट आल्याने मोठे संकट टळले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. मात्र, अचानक स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. यामुळे बोटीतल्या सर्व यंत्रणा बंद पडल्या. यंत्रणा बंद पडल्याने कॅप्टनला तत्काळ SOS हा आपत्कालीन संदेशही सुरक्षा यंत्रणांना पाठवता येत नव्हता. दरम्यान, भर समुद्रातच हा प्रकार घडल्याने कोणाच्याही मोबाईललाही रेंज नव्हती. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्याकांनी त्यांच्या मोबाईलला कमी रेंज असतानाही रेस्क्यूसाठी संपर्क साधला. त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना रेस्क्यू करण्याकरता तत्काळ दुसरी स्पीड बोट मागवण्यात आली. काही वेळातच ही दुसरी स्पीड बोट घटनास्थळी दाखल होत उदय सामंत यांना सुखरूप गेट वे ऑफ इंडियाला आणण्यात आले.

Exit mobile version