लालमिरचीला महागाईचा तडखा; मसाले ही कडाडले

। महाड । प्रतिनिधी ।
महागाईने उच्चांक गाठला आहे. पावसाळाजवळ आल्याने अगोटच्या खरेदीसाठी लगबग वाढली. सध्या लाल मिरची विकत घेण्याआधीच वाढत्या दराने सर्वसामान्यांना ठसका लागला आहे. लाल मिरचीचे दर 20 ते 30 मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात वाढले आहेत. जवळपास काही महिन्यात 20 ते 30टक्के भाववाढ झाली आहे. महाडच्या बाजारपेठेत सध्या मिरचीसह मसाले पदार्थ खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.

एप्रिलपासून बाजारात लाल मिरची मोठ्या प्रमाणात विक्री साठी येत आहे गेल्या काही महिन्यात सातत्याने भाववाढ होत असल्याने ग्राहकांना फटका बसला आहे पाऊस लाबण्याची शक्याता असल्याने व कडक उन्हात मिरची चांगली वाळत असल्याने लाला पावडर बविण्याची महिला वर्गाची लकबक सुरू असल्याने काही दिवस मिरची ला सुगीचे दिवस असणार आहेत.

बेडगी 450 रु किलो
सध्या बाजारात बेडगी मिरची 450 ते 460 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. गुंटूर मिरची 200 ते 230 रुपये किलो मिळत आहे. या दरात आणखी वाढ सुरूच राहणार असून पुढील काही दिवस लाल मिरचीच्या बाजारात तेजी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तवला आहे.

मसाला किमतीत 35 टक्के वाढ
2022 मध्ये आतापर्यंत हळद, हिंग, मिरची, जायफळ, दालचिनी, वेलची, जिरे आणि धने या मसाल्यांच्या दरात तब्बल 35 टक्के वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत या मसाल्यांच्या किमती 71 टक्क्यांनी वाढल्या असून, यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.

पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणा-या वस्तू व त्यावेळेस सा-याच वस्तूंचे भाव चढे असल्याने पावसाळयासाठी व दैनंदिन लागणार्‍या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्याठी ग्रामीण भागाती शेतकरी सह इतर ग्राहक महाड बाजारात मध्ये दाखल होत असून कांदा, बटाटा व लसूण, तिखट मिरची, हळद आणि कडधान्य खरेदी करतांना दिसत आहेत़ कांद्याच्या गोण्याच्या गोण्या खरेदीकरीतांना दिसत आहे.

Exit mobile version