रानमेव्याची आवक मुबलक

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन बाजारपेठेत रानमेव्याची आवक मुबलक प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च महिना सुरू झाल्यानंतर ओले काजूगर, काजूची फळे, पिकलेले आंबे, करवंदे, जांभळे, पांढरे जांभ, लाल जांभ, कच्च्या कैर्‍या, रांजणाची फळे बाजारपेठेत विक्रीसाठी आलेली दिसून येतात. यामध्ये सर्वात जास्त मागणी ओल्या काजूगारांना असते. कारण ओल्या काजूगरांची भाजी अतिशय रुचकर होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये देखील ओले काजूगर घातले जातात.

सदर रानमेव्याची विक्री करून त्यांची अर्थिक गरज भागते. ओले काजूगर प्रति शेकडा दीडशे ते दोनशे रुपयांनी विकले जातात. तर काही वेळेला हा भाव 250 रुपयापर्यंत देखील जातो. सध्या पिकलेले हापूस आंबे देखील बाजारात तीनशे ते साडेतीनशे रुपये डझननी विकले जात आहेत. रानमेव्याची खरेदी करताना ग्राहकांचा कल डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदे व जांभळे खरेदी करण्याकडेच जास्त असल्याचे पाहायला मिळते. प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये इतका भाव देखील जांभळाच्या फळांना मिळत आहे.

Exit mobile version