आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करावी-तहसीलदार

| तळा | वार्ताहर |

शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड बँक खात्याशी अथवा पोस्ट खात्याशी संलग्न करुन त्याची झेरॉक्स प्रत व आधार कार्डची झेरॉक्स प्रत संबधीत तहसील कार्यालयात त्वरीत जमा करण्यात यावी, असे आवाहन तळा तहसीलदार यांनी केले आहे.

डी.बी.टी पोर्टलवर लाभार्थ्याची माहिती अपलोड करण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे. लाभार्थ्यानी आपले आधार कार्डवरील माहिती अद्ययावत नसल्यास तात्काळ अद्यावत करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात यावे. तसे न केल्यास आपली माहिती डी.बी.टी.पोर्टलवरअपलोड होणार नाही, असे तळा तहसीलदार यांनी सांगितले.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अनुदानाच्या लाभापासून वंचित राहाल याची कृपया नोंद घेण्यात यावी. जिल्हयात निराधार, अंध, अपंग, शारीरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, या सर्व दुर्बल घटकासाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करावी, असे तहसीलदार म्हणाल्या.

Exit mobile version