| रत्नागिरी | प्रतिनिधी |
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन दिनाचे औचित्य साधून शिरगाव येथील खारफुटी क्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली. क्षेत्रभेटीत महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या खारफुटी प्रजातींची ओळख व खारफुटी वनातील जैवविविधतेची माहिती दिली. खारफुटीमध्ये होणारी मत्स्यशेती व त्यामध्ये चालणारे पर्यटन यावर माती आणि खारफुटी वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. क्षेत्रभेटीसाठी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र व भूगोल विषयाचे विद्यार्थी व भूगोल विषयप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड सहभागी झाले होते..