| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड बाजारपेठेतील अंजुमन हायस्कूल रस्त्यावरच्या गटारावरीव रस्ता खचल्यामुळे त्या ठिकाणी उभी असलेली गाडी त्या गटारात अडकली. दरम्यान, ही अडकलेली गाडी बाहेर काढताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अथक प्रयत्नानंरत ही गाडी बाहेर काढण्यात स्थानिक तरूणांना यश आले.
इनोव्हा गाडी चालकांने अंजुमन हायस्कूल रस्त्याच्या डाव्या बाजूला आपली गाडी उभी केली होती. काही वेळातच गटारावरील रस्ता खचला आणि ती गाडी गटारात अडकली. इनोव्हा चालकाने गाडी गटारातुन काढण्याकरिता दुसऱ्या गाडीची मदत घेतली होती. परंतु, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. शेवटी परिसरातील तरुणांनी ही गाडी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आले. दोन वर्षांपूर्वी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेने हा रस्ता व गटार बांधले होते.







