स्वप्नातील गावांच्या विकासासाठी पुढाकार

कृषी अधीक्षक कार्यालय – स्वदेस फाउंडेशन यांचा सामंजस्य करार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय , रायगड व स्वदेस फाउंडेशन यांचे मध्ये सात तालुक्यामधील शेतकर्‍याचा विकास करण्यासाठी कृषी विकास कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. सामंजस्य करारावर स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला व उज्वला बाणखेले, प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सह्या केल्या. यावेळी स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक प्रदीप साठे, उपसंचालक तुषार इनामदार, नीता हरमलकर, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, अफशान शेख , दत्तात्रय काळभोर, उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड,सतीश बोर्‍हाडे उपसंचालक आत्मा तथा नोडल अधिकारी( स्मार्ट )आणि भाऊसाहेब गावडे पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ, जिल्हा अंमलबजावणी कक्ष ( स्मार्ट) उपस्थित होते.

कृषीविकासाला प्राधान्य
सामंजस्य करार अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस फाउंडेशन काम करत असलेल्या गावांमध्ये तीन वर्षांमध्ये पोलादपूर ,महाड, माणगाव, तळा , म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड तालुक्यामधील शेतकर्‍यांसाठी कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत मँगो नेट नोंदणी, मँगो जीआय नोंदणी, शेतकरी कंपनीची स्थापना, शेतकरी गट निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना प्रकल्प अंमलबजावणी, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांना लाभ, बांबू विलेज निर्मिती, किसान क्रेडिट कार्ड नोंदणी व लाभ, सौर ऊर्जा कुंपण लाभ, प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभ व शेतकर्‍यांना विविध प्रशिक्षण या विषयांवर स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग एकत्रितपणे समन्वयाने काम करणार आहेत. उपसंचालक तुषार इनामदार यांनी आभार मानले.

सामंजस्य कराराचा फायदा स्वदेस फाउंडेशन अंतर्गत असणार्‍या स्वप्नातील गावांमधील शेतकर्‍यांना होणार असून कृषी विभागाच्या योजना जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग प्रयत्न करेल. – मंगेश वांगे, सीईओ, स्वदेस

सामंजस्य करारामुळे दक्षिण रायगड मधील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी स्वदेस फाउंडेशन बरोबर कृषी विभाग एकत्रितपणे काम करेल असे नमूद करून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा. – उज्वला बाणखेले जिल्हा कृषी अधीक्षक

Exit mobile version