आत्मनिर्भर भारतासाठी पुढाकार

| रसायनी | वार्ताहर |

कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर-न्हावी (असिस्टंट हेअर ड्रेसर) या पहिल्या व जेएसएसच्या पाचव्या बॅचचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेत देशभरातील एक हजार पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकार्मांना 2028पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, डॉ. नितीन गांधी, रत्नप्रभा बेल्हेकर, नरेन जाधव, डॉ. विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील 20 वर्षांपासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करीत आहेत.

Exit mobile version