| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने पनवेल येथील गुरुलिंगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत आवश्यक सुविधा सुधारण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने हॅपी स्कूल प्रोजेक्टचे आयोजन केले होते. येथील बहुतेक विद्यार्थी जवळच्या झोपडपट्ट्या आणि रेड-लाइट भागांमधून येतात, जिथे जागरूकता आणि पाठिंब्याच्या अभावामुळे शिक्षणाची संधी अनेकदा मर्यादित असते हे लक्षात घेऊन, आमच्या उपक्रमाने त्यांच्यासाठी एक चांगले आणि अधिक प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करुन या प्रोजेक्टचे आयोजन केले गेले.
क्लबच्यावतीने मराठी शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वॉटर प्युरिफायर, शिक्षणाला चालना देण्यासाठी ग्रंथालयातील व मेरी किताबची 100 पुस्तके आणि वर्गात आरामदायक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पंखा भेट दिला. शालेय साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी एक कपाट उपलब्ध करून देण्यात आले. जेवण बनवण्यास आणि स्वच्छतेस मदत करण्यासाठी 10-लिटरच्या कुकरसोबत ताट, चमचे आणि ग्लास भेट दिले. त्याचवेळी विद्यार्थ्यांना फळांचेही वाटप करण्यात आले. यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट भूमिका परमार, सेक्रेटरी दिपा आडमुठे आणि इतर मेंबर उपस्थित होते.
इनरव्हील क्लब गॅलेक्सीचा ‘हॅपी’ प्रोजेक्ट
