इनरव्हील क्लबची स्तनपानाबाबत जनजागृती

नवमातांना राजगिरा लाडू व खजूर पाकिटे वाटप
| कर्जत | प्रतिनिधी |

ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, त्याचा भाग म्हणून इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्तनपानाला अमृतपान असेही म्हटले जाते. दरवर्षी इनरव्हील जनजागृती अभियान राबविते. याबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ‘ब्रेस्टर फिडींग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इनरव्हील क्लबच्या आयएसओ प्राची चौडीए, ज्योत्स्ना शिंदे, सरस्वती चौधरी, सुलोचना गायकवाड, वैशाली दांडेकर, सुप्रिया गिरी, दिपा खनाल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, डॉ. संगीता दळवी उपस्थित होत्या.

आईच्या दुधामध्ये रोगप्रतिकार क्षमता जास्त असते, तसेच स्तनपान हे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता एक सुदृढ पिढी घडविण्यात आपला मोलाचा वाटा आहे, हे नवमातांनी लक्षात घ्यायला हवे, असा संदेश इनरव्हील क्लबच्या वतीने मार्गदर्शनात देण्यात आला. यावेळी नवमातांना राजगिरा लाडू व खजुराची पाकिटे देण्यात आली.

Exit mobile version