आय.एन.एस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

संपूर्ण भारतीय बनावटीची आय.एन.एस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केरळमधील कोच्चीमध्ये हा लोकापर्ण सोहळा पार पडला.

विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी 30 पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल 40 हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन 45 हजार टन एवढे असते. एका दमात 15 हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल 1400 पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील 100 किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-8 ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. तब्बल 262 मीटर लांब आणि 14 मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

Exit mobile version