भात पिकावर किडींचा प्रादूर्भाव

| पोलादपूर | वार्ताहर |

पोलादपूर तालुक्यात हवामान बदलामुळे भात पिकावर रोग व कीड प्रादुर्भाव तसेच परसुले येथे काही प्रमाणात निळेभुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे तालुका कृषी विभाग कार्यालयाच्यावतीने क्रॉपसॅप अंतर्गत रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. तालुक्याच्या विविध भागात अशाप्रकारच्या निळा भुंगेरे व किडींचा प्रादूर्भाव भात पिकावर आढळून आल्यास शेतकरी जनतेने करावयाच्या उपाययोजना तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तालुक्यात भात पिकावर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव मागील तीन-चार वर्षांपासून दिसून येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर ह्या किडीविषयी गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम करत आहेत. या जनजागृती कार्यक्रमास रमेश शिंदे, रवींद्र गुंड, श्रीरंग मोरे, मनोज जाधव, परशुराम जाधव, सुधीर जाधव, एकनाथ शेलार, गोपाळ जाधव, निळकंठ मोरे, बळीराम कदम सुशील जाधव, वामन मोरे, कृष्णा कदम आदी उपस्थित होते.

Exit mobile version