धोकादायक पूल, रस्त्यांची पाहणी करा- विक्रांत वार्डे

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| अलिबाग | प्रतिनिधी |

पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पुलांची कामे रखडली आहेत. अवकाळी पावसामुळे पूल, रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूल, रस्त्यांची पाहणी करून बांधकाम परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी शेकाप तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक प्रशासन व ठेकेदारांकडून कामांची गती अत्यंत संथ आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची कामे अर्धवट सोडली गेली आहेत. त्यामुळे पावसात नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात विद्यार्थी, प्रवासी व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे.

अपूर्ण आणि धोकादायक पायाभूत सुविधा वेळेवर तपासल्या गेल्या नाहीत, तर गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक गावांमध्ये रस्त्यांची पडझड, पूल खचणे, नाल्यांमधून पाणी ओसंडून वाहणे, तसेच बंधाऱ्यांच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील धोकादायक पूल, गावांना जोडणारे रस्ते, बंधारे यांची तातडीने पाहणी करावी. विशेषतः धोकादायक पूल व रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version