| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ते सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान, सर्व सुजान नागरिकांनी रस्त्यावरील होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत व सुरक्षित वाहन चालन करावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे.
पनपवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने विना हेल्मेट, अवैध विमा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वैद्य पीयुसी प्रमाणपत्रे नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट रस्त्यावर चालणारी वाहने, ऑटो रिक्षा नियमभंग, ओडिसी वाहतूक करणारी वाहने, वैद्य परवाना नसलेली वाहने, अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांसाठी या कार्यालयातर्फे निरंतर विशेष मोहिमा राबविण्यात येतात. गौण खनिज व ओव्हरलोड मालवाहतुक करणाऱ्या वाहनांवर विशेष तपासणी मोहिमा व कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत गेल्या दोन महिन्यांत साधारणतः 235 वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. एकूण तडजोड शुल्क रुपये 128.96 लाख इतका आकारण्यात आला आहे. या कारवाईत क्षमतेपेक्षाजास्त माल भरणे, नंबर प्लेट नसणे, मालावर अच्छादन नसलेली वाहने, रिफलेक्टर नसलेली वाहने व इतर प्रकारच्या दोषी वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी
