मध्य रेल्वेचे व्यवस्थापकांकडून भिवपुरी रेल्वे स्थानकाची पाहणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वे वरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी शनिवारी (दि.12) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांनी केली. त्यावेळी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघाने आपल्या मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वेच्या महावस्थापक यांना दिले.

मध्य रेल्वेच्या कर्जत अँड कडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून पादचारी पुलाची दुरुस्ती, स्थानकात पोहचण्यासाठी असलेल्या रस्त्यांची आणि मध्य रेल्वेच्या नियोजित कारशेड परिसराची पाहण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल आले होते. महाव्यवस्थापक गोयल हे लोणावळा कर्जत असे भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात पोहचले. त्यावेळी भिवपुरी रोड प्रवासी संघाचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कोषाध्यक्ष महेश कडव, सल्लागार अ‍ॅड.उत्तम गायकवाड, अपंग प्रतिनिधी अमर साळोखे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र राऊत, अशोक गायकवाड, सुप्रेश साळोखे,सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी भिवपुरी रोड रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांना सादर केले.

Exit mobile version