| खांब | वार्ताहर |
जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या ‘एक दिवस शेतकर्यांसाठी’ या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून जि.प. कृषी विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांच्या व अन्य अधिकारी वर्गाच्या समवेत रोहा तालुक्यातील शेती क्षेत्रांना भेटी देऊन पावसाळी भातलावणीच्या कामांची पाहणी केली.
रोहा तालुक्यातील सांगडे येथील कृषीनिष्ठ शेतकरी केशव खरिवले यांच्या भातशेती क्षेत्रात जाऊन भात पिकाची पाहणी करून व प्रत्यक्षात लावणी करून शेतकरी वर्गाला प्रोत्साहित केले. सध्या भातलागवडीसाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने एक चांगला पर्याय म्हणून यंत्राच्या सहाय्याने भातलागवड करणे हा एक चांगला पर्याय असल्याने त्यांनी शेतावर जाऊन यांत्रिक पद्धतीने लागवडीचे प्रात्यक्षिक पाहिले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, जिल्हा कृषी अधिकारी राजेश घरत, गटविकास अधिकारी श्रीम. पाटील, लेखाधिकारी सतीश घोळवे, सहा. गटविकास अधिकारी फडतरे, विस्तार अधिकारी रणजित लवटे, अशोक दांडेकर, ग्रा.वि. अधिकारी वेटकोळी यांच्यासह पं. समिती अन्य अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.