हेटवणे- शहापाडा पाणी पुरवठा कामाची पहाणी

। पेण । वार्ताहर ।
पेण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने 23 नोव्हेंबर रोजी उपअभियंता महाराष्ट्र प्राधिकरण उपविभागीय कार्यालय पेण वाशी नाका येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. त्यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने कार्यकारी अभियंता चंद्रकांत गजबिये यांनी शब्द दिला होता की, दर महिन्याला काम कसे प्रगती पथावर आहे याची माहिती दिली जाईल. आणि येत्या चार महिन्यात हेटवणा शहापाडा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार महिन्यात पूर्ण केली जाईल. आज मा. आमदार धैर्यशील पाटील यांच्या आदेशाने जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे व खारेपाटातील पदाधिकार्‍यांनी सुरु असलेल्या कामाची पहाणी करुन काम कशाप्रकारे चालले याची अधिकारी वर्गांकडून माहिती घेतली.


यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी सांगितले की, 31 मार्च 2022 पर्यंत हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पूर्ण करणार असल्याचे शब्द धरणे आंदोलनाच्या वेळी माजी आ. धैर्यशील पाटील यांना आधिकारी वर्गाने दिलेले आहे. खारेपाटाला पाणी लवकरात लवकर मिळावे म्हणून कामाची प्रगती काय स्थितीत आहे हे पाहण्यासाठी ते आले होते. खारेपाटाला पाणी मिळावे म्हणून आमचे नेते धैर्यशील दादा हे खारेपाटातील जनेतेच्यासाठी पेण ते मुख्यमंत्री बंगला हे अंतर पायी चालत जाऊन 29 कोटी निधी मिळवली आह,े तो निधी आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. यावेळी त्याच्या सोबत लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, दिव चिटणीस संदेश ठाकुर, सरपंच विवेक म्हात्रे, कालेश्रीचे मा. सरपंच महेश ठाकुर, राकेश वर्तक, नगरसेवक संतोष पाटील आदी सह शेकाप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version