मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून रानवली हद्दीतील कामांची पाहणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायत हद्दीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी केलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रोजगार हमी योजनेतून इतर कामे हाती घ्यावीत असे आवाहन केले.
रानवली ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गुरांचा गोठा, फळबाग लागवड कामांची पाहणी डॉ. किरण पाटील यांनी केली. यावेळी सरपंच शेजल गजमल, श्रीवर्धन पंचायत समिती गटविकास अधिकारी उद्धव होळकर, विस्तार अधिकारी डी.एन.दिघीकर, विस्तार अधिकारी के.व्ही.नागे साहेब, ग्रामसेवक संघटना उपाध्यक्ष तुषार गायकवाड, ग्रामसेवक अभिजित माने उपस्थित होते.

Exit mobile version