कर्जत नगरपरिषदेचा पाहणी दौरा

| कर्जत । वार्ताहर ।
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर 5 जुलै रोजी सायंकाळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी नगरपरिषद क्षेत्रात पाहणी केली.

नगरपरिषद क्षेत्रात मुद्रे बुद्रुक गावठाण भाग, गुंडगे, भिसेगाव या भागात अतिवृष्टीमुळे भुख्खलन, दरड कोसळ्याचे प्रकार पूर्वी झाले होते.पावसाळ्यात आजू बाजूला पाणी साठल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन दिवसापूर्वी चारचाकी वाहन हे रस्त्याच्या खाली उतरले होते त्या रस्त्याची पाहणी करून पावसाळ्यात हा रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याठिकाणी फलक लावण्यात येतील असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी कर्जत नगर परिषद क्षेत्रात ज्या ठिकाणी फिरल्या. त्यावेळी सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, वैशाली मोरे, संचिता पाटील, संतोष पाटील, मनिष गायकवाड, लक्ष्मण माने, सुदाम म्हसे, सुनिल लाड उपस्थित होते.

Exit mobile version