कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता अलिबाग यांना ग्रामस्थांकडून निवेदन सादर
। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथे विजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबात कार्यकारी अभियंता शैलेश कुमार सिंगव उपकार्यकारी अभियंता कमलाकर अंबाडे अलिबाग व उपअभियंता बेलपाडा – रेवस यांनाही रेवस कोळीवाडा ग्रामस्थांतर्फे निवेदन सादर करण्यात आले. जुना ट्रान्सफॉर्मर वीसवर्षांपुर्वी बसविण्यात आलेला होता. प रंतु आता विज कनेक्शन वाढल्यामुळे सन 2024 ते2025 या वर्षात 600 मीटर पर्यंत कनेक्शन वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. सतत रात्री-अपरात्री लाईट गेल्याने पावसाळी कालावधीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबत उप अभियंता बेलपाडा-रेवस या कार्यालयात वारंवार तक्रार व निवेदने प्रत्यक्षात भेटी देवून देण्यात आले आहेत. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तसेच रात्र पाळीला रेवस कोळीवाड्यात विद्युत मंडळाचा एकही कर्मचारी अधिकृत नियुक्त न केल्यामुळे लाईट गेल्यानंतर तीन ते चारतास दुसर्या कर्मचार्याची वाट पहावी लागते. त्यामुळे सदर बाब लक्षात घेवून 600 विद्युत मिटर क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर नव्याने बसवून रेवस गावची विजेची गंभिर समस्या तातडीने सोडविण्यात यावी.