| पुणे | प्रतिनिधी |
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहिल्याने राज्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, 1 जून ते 12 सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा 15 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे 36 पैकी 21 जिल्ह्यांत अपुऱ्या पावसाची स्थिती असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या अंदाजानुसार, एल निनोचा प्रभाव आणखी काही काळ राहणार असला तरी पुढील वर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वी एल निनोची स्थिती निवळून न्यूट्रल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील मान्सूनसाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरू शकते. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली; मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड; तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा अपुऱ्या पावसाच्या श्रेणीत समावेश आहे.
राज्यातील 21 जिल्ह्यांत अपुरा पाऊस
