पर्यवेक्षिका यांची अनेक पदे रिक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतमध्ये आदिवासी आणि दुर्गम भागाच्या तालुक्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी केंद्र चालविले जातात. या सर्व केंद्रांचे नियोजन करण्यासाठी एकात्मिक बालविकास विभाग काम करीत आहे. तालुक्यात 330 अंगणवाडी केंद्र असून त्या केंद्रांचे संचलन करण्यासाठी कर्जत एक आणि कर्जत विभाग रायगड जिल्हा परिषदेने बनविले आहेत. मात्र, त्या दोन्ही प्रकल्पमध्ये प्रकल्प अधिकारी यांची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील अंगणवाडी यांच्या नियोजनाची जबाबदारी असलेली पर्यवेक्षीका यांची 11 पैकी सहा पदे रिक्त असून सर्व ठिकाणी कारभार हा प्रभारींवर सुरु आहे.
कर्जत तालुका कुपोषित बालके असलेला तालुका म्हणून चर्चेत राहिला आहे. या तालुक्याची भौगोलिक रचना पाहता तालुक्याचा पसारा मोठा आहे. त्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वस्ती करून राहत असल्याने या भागातील लोकांच्या कामासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेता कुपोषण समस्या तालुक्यासाठी चितेंची बाब ठरली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र असून त्या गावे आणि आदिवासी पाडे यांच्या ठिकाणी असणारी अंगणवाडी केंद्रामधून बालकांना पोषण आहार दिला जातो. त्याचवेळी गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना देखील पोषण आहार दिला जातो. मात्र, त्या सर्व यंत्रणेवर तालुका स्तरावरून लक्ष देण्यासाठी असलेले प्रकल्प अधिकारी यांची पदे रिक्तआहेत.
कर्जत तालुक्यात एक आणि कर्जत दोन अशी एकात्मिक बालविकास विभागाची प्रकल्प असून त्यातील प्रकल्प एकमध्ये 160 अंगणवाड्या केंद्र यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रकल्पामध्ये सहा पर्यवेक्षिकांची मंजूर पदे असून सध्या चार पर्यवेक्षिका या कार्यरत आहेत. तर प्रकल्प दोनमध्ये 170 अंगणवाडी केंद्र असून त्या अंगणवाडी केंद्रांसाठी पाच पर्यवेक्षिका यांची पदे मंजूर असून त्यात केवळ एकमेव पर्यवेक्षिका कार्यरत असून चार पदे रिक्त आहेत. तालुक्यात दोन प्रकल्प असून त्या दोन्ही प्रकल्पात समन्वयाची भूमिका बजावणारे विस्तार अधिकारी यांची नेमणूक केली जाते. मात्र, तालुक्यातील दोन विस्तार अधिकारी यांच्या पैकी एका विस्तार अधिकारी यांची देखील बदली झाली असून एका विस्तार अधिकारी यांचे पद देखील रिक्त आहे.
तालुक्यात 330 अंगणवाडी केंद्रांमध्ये 17000 बालके येत असतात आणि त्यांना पोषण आहार दिला जातो. त्या बालकांना कुपोषणाच्या समस्येतून बाहेर काढण्यासाटःई एकात्मिक बालविकास प्रकल्प यांची महत्वाची भूमिका असते. मात्र कर्जत तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प मध्ये असलेले दोन्ही प्रकल्प अधिकारी यांची पदे रिक्त असून ता;लुक्यात अंगणवाडी केंद्रावर जाऊन तेथील आढावा घेणार्या पर्यवेक्षिका यांची मंजूर 11 पदे असताना त्यातील सहा पर्यवेक्षिका यांची पदे रिक्त असल्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाचा कर्जत तालुक्यातील कारभार रामभरोसे सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.