‘भूत जबर मोठं गं बाई’ गाण्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अ‍ॅवॉर्ड

। सायली पाटील । अलिबाग ।
अलिबागकरांकडून आणि अलिबागच्या बाहेरही भरभरून प्रेम मिळालेले अभंग रिपोस्ट आणि सिनेरिया फिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या ‘भूत जबर मोठं गं बाई’ या गाण्याला हजारोंमध्ये व्ह्यूव्ज गेल्या. पण, हे गाणं एवढ्यावरचं थांबलं नसून वन अर्थ अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेस्ट म्युझिक व्हिडिओ (सिल्व्हर) हा बहुमान या गाण्याने पटकाविला आहे.

सध्याच्या या कलियुगात आपण माणसांनी जरी आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या कितीही प्रगती केली असली तरीदेखील आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेचा भडीमार पाहायला मिळतो. कधीकधी तर शिकल्यासवरल्यांच्या घरातसुद्धा हीच अंधश्रद्धा गळा घोटताना दिसून येते. बागुलबुवा, भूत, प्रेत, मुंजा, चेटकीण, हडळ अशी वेगवेगळ्या नावांनी अस्तित्वात नसलेली तरीही सातत्याने नामस्मरण केल्यासारखी माणसाने स्वतःहूनच निर्माण केलेली ही पात्र अंधश्रद्धेच्या दुनियेत चांगलाच घोळ घालतात.

त्यामुळेच जबरदस्त म्युझिक, अफलातून व्हिडिओग्राफी, भारूडाचे कमालीचे रिक्रिएशन असलेल्या भूत जबर मोठं गं बाई या गाण्याला वन अर्थ अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेस्ट म्युझिक व्हिडिओ (सिल्व्हर) हा बहुमान मिळाला आहे.

समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले आयुष्य व्यतित केलेल्या सर्वांसाठी हा पुरस्कार समर्पित करतो. – झेडएमजीके टीम

खुपच सुंदर पद्धतीने ही व्हिडिओ बनवली गेली होती. प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसह आणखी दोन-तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून अजून त्यांचा निकाल येणं बाकी आहे. परंतू, आम्ही या गाण्यासाठी सहभाग घेतलेल्या पहिल्याच स्पर्धेत बक्षीस मिळाल्याने खुप जास्त आनंद होत आहे. – प्रणव पाटील, दिग्दर्शक

या गाण्यात भूताची भूमिका बजावताना तो मेकअप, ती वेशभूषा आणि एकंदरितच गाणं करताना फार मजा आली. आणि आता या गाण्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेस्ट म्युझिक व्हिडिओ (सिल्व्हर) हा बहुमान मिळाल्यामुळे संपूर्ण टीमचा आनंद द्विगुणित झाला आहे. – अनिश पानसरे, कलाकार

Exit mobile version