आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली आहेत.तसे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होत नाहीत, ज्यांना मंजूरी दिली आहे आणि ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे अशा देशांतील उड्डाणे, सुरू राहतील. यापूर्वी, डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत 31 जानेवारी 2022 पर्यंत बंदी वाढवली होती.

Exit mobile version