माणगावातून आंतराष्ट्रीय जलतरणपटू तयार करणार

प्रशिक्षक दत्ता तरेंनी व्यक्त केला विश्‍वास

। माणगाव । प्रतिनिधी ।

शालेय विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षण देऊन त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचा संकल्प आंतराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे यांनी व्यक्त केला. माणगाव-भादाव येथील साई मॅगो रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय दुबई युएई मिल्ट्री स्कूल स्विमिंग कोच, आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले जलतरण स्पर्धक रायगड जिल्ह्यात तयार करून अनेकांना भारतीय नौदल, सेनादल, वायुदल या तिन्ही विभागात खेळाडू आरक्षणांतर्गत विद्यार्थांना संधी मिळून दिली. गेली 30 वर्षे हे रायगडसह महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवर जलतरण प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर अमेरिकन स्विमिंग कोचेस असोसिएशन बंगलोर या संस्थेत जलतरण प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. माणगावसह रायगड जिल्हात राज्याचे क्रीडा संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार जलतरण स्पर्धेत जे शालेय जलतरण स्पर्धेत सहभागी होत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना शासनाने या स्पर्धेसाठी प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून या खेळालाही उत्तेजन मिळेल, अशी आशा या प्रशिक्षणात बोलताना तरे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version