| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एजुकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालय वेश्वी अलिबाग येथे मंगळवार (दि.12) आंतरराष्ट्रीय युवादिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व कनिष्ट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ॲड.निलोफर शेख उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना Anti-Ragging Laws, Traffic Rules या संदर्भात माहिती दिली. तर ॲड. तन्मय म्हात्रे यांनी World Tribal Day, NALSA/MALSA मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध स्कीम बदल सविस्तर माहिती दिली. तेजस्विनी निराळे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवस प्राधिकरण, रायगड अलिबाग यांनी विद्यार्थ्याांंचे हक्क तसेच जिल्हा विधी प्राधिकरण यांच्याकडून उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा तसेच समाजामध्ये युवा वर्गाचे योगदानावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विक्रांत वार्डे, प्राचार्य रविंद्र पाटील, उप्राचार्य निशिकांत कोळसे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन तेजेश म्हात्रे यांनी केले.







