। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वाणिज्य व अकाउंटन्सी विभाग आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी आपले मत मांडताना सांगितले की, आपल्या कष्टाने कमवलेल्या पैशाची गुंतवणूक करत असताना योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे, पैशाची बचत करणे ही सुध्दा एक मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले. तरुण वर्गाने गुंतवणूक कशी करावी, गुंतवणूक करत असताना कोणती काळजी घ्यावी, सेबीचे काय नियम आहेत, फसवणूक झाल्यास काय केलं पाहिजे यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन मिली पौल यांनी केले. राजू गोरुले यांनी या कार्यक्रमाचे प्रयोजन काय आहे, हे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.कल्याणी नाझरे यांनी केले तर सूत्रसंचालन नवज्योत जावळेकर यांनी केले.
गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम
