। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणीची सभा नुकतीच खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे पार पडली. या सभेत आगामी 2024-25 च्या क्रिकेट हंगामासाठी विविध वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आला.
जिल्ह्याच्या संघाची निवडचाचणी स्पर्धात्मक स्वरूपात व्हावी यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे. स्पर्धा घेताना त्याचे पूर्वनियोजिन, स्वरूप व प्रत्येक्ष मैदानावरचे आयोजन व्हावे, यासाठी सभेमध्ये चर्चा करण्यात आली. प्रत्येक वयोगटात जिल्ह्यातील निश्चित किती संघ सहभागी होतील व त्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्पर्धेच्या तारखा, मैदाने, पंच, स्कोअरर्स व निधीची तरतूद करता यावी म्हणून अकॅडमी, क्लब व संघांना आपल्या स्पर्धेसाठी विविध वयोगटात निश्चित सहभाग घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांच्याकडून करण्यात आले आहे. ही स्पर्धा नोंदणी ऑनलाईन गुगल फॉर्म द्वारे 31 जुलैपर्यंत करता येणार असून अधिक माहितीसाठी प्रदिप खलाटे 8767959962, अॅड. पंकज पंडित 8149252829, शंकर दळवी 9422594141 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आरडीसीए कार्यकारणीच्या सभेसाठी अध्यक्ष अनिरुद्ध पाटील,सचिव प्रदिप नाईक, सदस्य यशवंत साबळे, जयंत नाईक, प्रशांत ओक, संतोष भोईर, राजेश पाटील, संदीप पाटील, कौस्तुभ जोशी, सतिष पाटील, अँड.पंकज पंडित, प्रदिप खलाटे आदी उपस्थित होते.





