| मुंबई |
सुनिर्मल फाऊंडेशन मुंबईच्यातर्फे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करण्यार्या महिलांचा महाराष्ट्राचे हिरकणिंघन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, वैद्यकीय, उद्योग, शेती, बचतगट, संस्था आणि संघटना, सामाजिक आणि इत्तर क्षेत्रात ठसा उमठविणार्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. दादर येथील मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय येथे प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ साजरा होणार आहे. नाव नोंदणीकरिता 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत दत्ता खंदारे यांच्या 9699313621 /9869372494 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.