। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2022च्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, आयपीएल 2022चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकार्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे. यावेळी 10 संघ लिलावात सहभागी होतील, कारण लखनऊ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी आयपीएल लिलावादरम्यान बोली लावली जाऊ शकते. दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबादसाठी 1 डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी 33 कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी 3 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे. ही लीग 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते. 4 किंवा 5 जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे 14-14 सामने खेळावे लागणार आहेत. 7 सामने घरच्या मैदानावर तर 7 सामने घराबाहेर खेळवले जातील.