| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 विश्वचषक उंचावला होता. या विश्वचषकासह राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. बीसीसीआयसोबतचा करार संपल्यानंतर द्रविड आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. राहूल द्रविड कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा प्रशिक्षक होईल, अशी होती. पण, आता द्रविड त्याची जुनी फ्रँचायझी राजस्थान रॉयल्ससोबत काम करणार असल्याचे कळत आहे. राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा सुरू आहे. याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.