। अलिबाग । प्रतिनिधी ।
पेण मार्गावरील राऊतवाडी परिसरात बिबट्या दिसला असल्याची चर्चा सुरु आहे. तळ्याजवळ तो दिसल्याची चर्चा जोर धरत आहे. या चर्चेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परिसरात सकाळी जाऊन पाहणी केली. त्या परिसरात कुठेही बिबट्याचे पदमार्क दिसून आले नाही. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. आक्षी नंतर बिबट्याचा वावर आता राऊतवाडी परिसरात असलेली चर्चा जोर धरत आहे.







